करिनाच्या `या` शर्टाची किंमत ठाऊक आहे ?
गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर तिचा आगामी चित्रपट `वीरे दी वेडिंग` च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. आता ती आपल्या फ्रेंड्ससोबत वेळ घालवत आहे. तिचा वीक एन्ड सुरु झालाय, असं म्हणायला काही हरकत नाही. बुधवारी करिना कपूरने आपली बहीण करिश्मा, बेस्ट फ्रेंड अमृता राव आणि मलायका अरोरा सोबत पार्टी केली.
यात नताशा पुनावाला, रीमा जैन आणि हसीना जेठमलानी त्याचबरोबर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा देखील सहभागी झाले होते. त्यांच्या या पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यात सर्वचजण मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. या पार्टीचे फोटोज फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अमृता अरोराने सोशल मीडियावर शेअर केले.
या पार्टीत करिनाने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. सिल्कच्या या शर्टासोबत करिनाने गुलाबी रंगाचा स्कार्फ देखील घेतला होता. मात्र तिच्या या शर्टाची किंमत थक्क करणारी आहे. त्या शर्टाची किंमत आहे ५७००० रुपये. करिनाचं हे शर्ट मेड इन इटली असून प्युअर स्लिकचं आहे.