मुंबई :  करिना कपूर, सैफ अली खान सोबत किंबहूना त्यांच्याहून अधिक आजकाल तैमुर अली खानच सतत प्रकाशझोतात असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूरचा नवा आलेला प्रत्येक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो. 
तैमूरच्या जन्मानंतर काही दिवसांमध्येच करिना कपूर कामावर पुन्हा रूजू झाली. आणि आता करिनासोबत तैमूरदेखील चित्रपटांमध्ये झळकेल अशा बातम्या आहेत. 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटामध्ये करिना कपूर सोबत सोनम कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये तैमूर देखील दिसेल असे वृत्त झपाट्याने पसरत आहे. 


काही मीडिया रिपोर्टनुसार, एका सीनमध्ये तैमूर दिसणार आहे. पण करिनाच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तैमूर 'वीरे दी वेडिंग'मध्ये गेस्ट अपियरन्स देणार नाही. तैमूर बाबतच्या या केवळ अफवा आहेत. 
सध्या 'वीरे दी वेडिंग' चे शुटिंग बंद आहे. त्यामुळे तैमूर चित्रपटाची शक्यता तूर्तास नाही. या चित्रपटाचे प्री प्रोडक्शन सुरू आहे.