मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. तिने नुकताच तिच्या आणि अभिनेता सैफ अली खानच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच करीनाच्या पुन्हा कामावर हजर होण्याच्या चर्चांनी जोर धराला आहे. करीना पुन्हा कामावर परतण्याच्या पुर्ण तयारीत आहे. आता देखील करीनाने मोठा ब्रेक घेतला नाही. करीनाने तिचा हेअर आणि मेकओवर लूक देखील बदलला आहे. तिने तिच्या नव्या लूकचा व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या करीनाच्या नव्या लूकचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पण करीनाने आता शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ एखाद्या सिनेमाच्या किंवा जाहिरातीच्या चित्रीकरणनसून तिने तिच्या नव्या बाळासाठी नवीन लूक केला आहे. करीनाने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देखील दिलं आहे. 


'ओके... आता  मी अधिक बर्प, कपडे आणि डायपर्ससाठी तयार आहे.' असं म्हणत तिने नव्या लूकचे  फोटो शेअर केले आहेत. करीनाच्या या पोस्टवर अभिनेत्री मलायका अरोराने  कमेंट करत ‘यू गॉर्जियस मम्मा’ असं म्हटलं आहे.  करीनाने  २१ फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. 


दरम्यान, करीनाने 8 मार्च म्हणजे महिला दिनां औचित्य साधत तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण यामध्ये छोट्या खानचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. करीनाने दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'असं काही नाही जे महिला करू शकत नाही.' असं लिहिलं होतं.