सोशल मीडियातून करीनाच्या `निर्दयी`पणावर जोरदार टीका
भीक मागणाऱ्या लहान मुलीप्रती करिनाची वागणूक
मुंबई : २५ डिसेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आहे. सामान्य जणतेसोबतच कलाकारांनी देखील या सणाचा विशेष आनंद लुटला. ख्रिसमसचं औचित्य साधत अभिनेत्री करिना कपूर खान आणि मुलगा तैमूर अली खाना वांद्रे येथील वांद्रे येथील माउंट मेरी चर्चमध्ये गेले होते. यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तिने तैमूरला कमरेवर उचलून घेतल्याचे दिसत आहे. त्यावेळी एक लहान गरीब मुलगी तिच्याजवळ आली आणि भीक मागू लागली. ख्रिसमस असल्यामुळे माउंट मेरी चर्चमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आपल्या आवडल्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली.
पण त्या मुलीकडे करिनाने वळूनही पाहिले नाही. शिवाय तिकडे उपस्थित पोलीस महिला कर्मचारी देखील त्या मुलीला करिनापासून दूर करत असल्याचं दिसत आहे. करिनाच्या अशा वागणुकीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
मानव मंगलानीने तिचा हा निर्दयी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. करिनाची ही वागणूक तिच्या चाहत्यांना आवडलेली नाही. कोट्यावधींची मालकीन असून देखील तू एका लहान मुलीची मदत करू शकली नाहीस का? असा प्रश्न करिनाला विचारला जात आहे.
तर, करिनाचा 'गुडन्यूज' चित्रपट २७ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या सिनेमात करिनासोबत अक्षय कुमार, कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका आहेत.