मुंबई : करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा 28 वर्षांची दिसते. फिटनेसच्या बाबतीत करिश्मा आजच्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.आजही करिश्माची मोहिनी कमी झालेली नाही. करिश्माप्रमाणेच तिची मुलगी समायराही खूप सुंदर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्लिम समायरा अनेक प्रसंगी ग्लॅमरस दिसली आहे. मग ते वेस्टर्न ड्रेस असो किंवा देसी लेहेंगा समायरा खूप स्टायलिश दिसते. अनेकदा समायरा कपूर कुटुंबासोबतचे फोटो समोर येत असतात. नुकताच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.


 करिश्माची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांना पार्टी किंवा विमानतळावर स्पॉट केलं जातं. समायरा, करिश्मा कपूर आणि संजय कपूरची मुलगी आहे. करिश्मा एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. आताही तिची चर्चा रंगत असते. समायराचे तिच्या वडिलांच्या नव्या कुटुंबासोबत देखील चांगले संबंध आहेत. समायराला अनेकवेळा संजय कपूर आणि प्रिया सचदेवसोबत वेळ घालवताना पाहिलं गेलं आहे.



इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये समायरा एअरपोर्टवर दिसत आहे. यादरम्यान समायरा ब्लॅक स्पॅगेटी टॉप आणि ग्रे ट्रॅक पॅंटमध्ये दिसली. डोळ्यांवर चष्मा आणि लांब मोकळे केस, साध्या लूकमध्येही ती खूप सुंदर दिसत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


समायरा कपूर कुटुंबातील फंक्शन्समध्ये अनेकदा स्पॉट होते.  इतर स्टार किड्सप्रमाणे ती जास्त पार्ट्यांमध्येही दिसत नाही. करिश्माची मुलगी समायरालाही लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही, ती स्वत:ला या झगमगत्या जगापासून दूर ठेवते. समायराचं तिची मावशी करिनासोबतही चांगलं बॉन्डिंग आहे. करीना आणि समायरा अनेकदा फोटोंमध्ये एकत्र दिसतात. दोघंही बॉलिवूडच्या काही पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत.