11 सुपरहिट सिनेमा तरी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद! कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
Karishma Kapoor And Govinda: करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले.
Karishma Kapoor And Govinda: करिश्मा कपूर आणि गोविंदा ही बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी आहे. 90 च्या दशकातील मुला-मुलींनी या जोडीचे बहुतांश सिनेमा पाहिले असतील. करिश्मा-गोविंदा या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ज्यातील बरेच सुपरहिट ठरले. त्यामुळे या जोडीने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्हीच्या जमान्यात टीव्हीवर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडायच्या. या जोडीने राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1 आणि हसीना मान जायेगी सारखे चित्रपट केले आहेत. पण नंतर अचानक त्यांनी एकत्र काम करणे बंद केले. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता. काय होतं यामागचं कारण? जाणून घेऊया.
करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. दोघांनी 2000 मध्ये एकत्र काम करणे बंद केले. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. असं या दोघांमध्ये काय झालं? असे प्रश्न चाहत्यांना पडू लागले.
कपूर परिवारातील युवा पिढीचे बॉलिवूड पदार्पण आणि करिअरदेखील पटकन होते, हे आपण पाहिले असेल. पण करिश्माला याला अपवाद होती. कपूर घराण्यात बंड करुन वेगवेगळ्या भूमिका साकारणारी हिरोईन म्हणून करिश्माला ओळखले जायचे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला करिश्माला खूप संघर्ष करावा लागल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, कॉस्ट्यूमचा अनूभव ती घेत होती. या काळात तिला गोविंदासोबत काम करण्याची संधी मिळाली. गोविंदासोबत केलेल्या चित्रपटांनी तिच्या करिअरला नवी ओळख मिळाली. दोघांनी 11 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले.
करिश्माने घेतला निर्णय
पण त्यानंतर करिश्माने मसाला चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिला आता आमिर, सलमान आणि शाहरुख अशा खान्ससोबत काम करायचे होते. त्यामुळेच तिने गोविंदासोबत काम करणे बंद केले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
1996 मध्ये 'राजा हिंदुस्तानी' सिनेमा सुपरहिट ठरला. यातील गाणी लोकांच्या तोंडातून हटत नव्हती. या चित्रपटात करिश्माला आमिर खानसोबत कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि करिश्मा इंडस्ट्रीतील ए-लिस्टर अभिनेत्रींपैकी एक बनली होती. यानंतर करिश्माला अनेक हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्स मिळू लागले. करिश्माने सलमान खानसोबत 'जुडवा' मध्ये काम केले. यानंतर शाहरुख खानसोबत 'दिल तो पागल है' सिनेमा केला. काही अवधीतच करिश्मा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. या सर्वात करिश्मा-गोविंदाची जोडी मागे पडत गेली.
गोविंदाच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकले नाही
गोविंदाच्या 'कुली नंबर 1' हा चित्रपट 1995 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा 6 वा चित्रपट होता. हा कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी बघायला मिळाली होती.'साजन चले ससुराल' हा कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट आहे. ज्यामध्ये गोविंदासोबत करिश्मा कपूर आणि तब्बू दिसले होते. या चित्रपटाचे बजेट 4.25 कोटी होते. या चित्रपटाने 13.82 कोटींची कमाई केली होती. गोविंदा, अनिल कपूर आणि जूही चावला यांचा 'दीवाना मस्ताना' हा चित्रपट देखील खूप कॉमेडी आहे. या चित्रपटाचे बजेट 6 कोटी रुपये इतके होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24 कोटींची कमाई केली होती. 1998 मध्ये रवीना टंडन आणि गोविंदाचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दूल्हे राजा' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 5 कोटी होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 21.45 कोटी रुपयांची कमाई केली होती. गोविंदा, संजय दत्त, करिश्मा कपूर आणि पूजा बत्रा यांचा 'हसीना मान जाएगी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटातील संजय दत्त आणि गोविंदाची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती.