नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती `ही` अभिनेत्री
Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...
Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रणबीर सुखी संसार करत असला तरी त्याच्या चाहत्यांच्या यादीत आजही तरुणींची संख्या ही जास्त आहे. पण तुम्हाला माहितीये ना रणबीरच्या आयुष्यात एक असा क्षण आला होता जेव्हा तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आलियाशी लग्न करण्या आधी रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं.
रणबीर कपूर हा कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होते. करीनानं तिला थेट सगळ्यांसमोर वहिणी म्हटलं होतं. रणबीर कपूरची बहीण करिश्मा कपूरला वाटत होतं की तिच्या भावासाठी दीपिका किंवा कतरिना आणि आलिया भट्ट देखील नाही तर दुसरीच अभिनेत्रीला वहिणी म्हणून हवी होती. आलिया भट्टसोबत आज करीना आणि करिश्माचं नातं चांगलं असलं तरी एक काळ होता जेव्हा करिश्माला सोनम कपूर रणबीरची पत्नी म्हणून हवी होती. याचा खुलासा स्वत: सोनम कपूरनं करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या शोमध्ये केला होता.
सोनम कपूर जेव्हा करीना कपूरसोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती तेव्हा, करणनं तिला प्रश्न विचारला होता की कधी तिनं कपूर कुटुंबाची सून होण्याचा विचार केला आहे का? तर त्यावर उत्तर देत सोनम म्हणाली, "मला वाटतं की करिश्मा कपूरची इच्छा होती, पण आम्ही चांगले मित्रच आहोत."
दरम्यान, सोनम कपूर आणि रणबीर कपूरनं 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सांवरिया' या संजय लीला भन्साळीच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या दरम्यान, दोघांच्या अफेयरची चर्चा समोर आली होती. खरंतर, त्या दोघांचं नातं लवकर संपल्याचं देखील म्हटलं जाऊ लागलं होतं आणि त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात दीपिका पदुकोणची एन्ट्री झाली होती. दरम्यान, कॉफी विथ करणमध्ये दीपिका आणि सोनमनं रणबीरला 'कंडोम' ची जाहिरात करण्याचा सल्ला दिला होता. ज्यानंतर दोघांना रणबीरनं मीन गर्ल देखील म्हटलं होतं.
हेही वाचा : 'माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही'; खान कुटुंबाविषयी बोलताना असं का म्हणाला आयुष शर्मा?
रणबीरविषयी बोलायचे झाले तर तो नुकताच अॅनिमल या चित्रपटात दिसला. तर दुसरीकडे करिश्मा कपूरविषयी बोलायचे झाले तर करिश्मा ही मर्डर मिस्ट्री या चित्रपटात दिसली होती.