52 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होतोय करिश्मा कपूरचा Ex नवरा
जुळ्या बाळांचा होणार बाबा
मुंबई : करिश्मा कपूर आपल्या आजीच्या अचानक जाण्याने अतिशय दुःखात आहे.असं असताना तिच्या दुःखात आणखी भर होणार आहे. करिश्माच्या एक्स नवऱ्याबाबत संजय कपूरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय आणि करिश्माने 2016 साली आपल्या 13 वर्षांच लग्न मोडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर संजयने गेल्यावर्षी गर्लफ्रेंड प्रिया सचदेवसोबत लग्न केलं. आता संजय पुन्हा एकदा बाबा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया सचदेव गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.
आता संजय कपूर 52 व्या वर्षांत तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. संजय कपूर आणि करिश्मा कपूरला 2 मुलं आहेत त्यांची नाव समायरा आणि कियान अशी आहेत. या दोन्ही मुलांची जबाबदारी करिश्माकडे आहे. मात्र संजय या दोन्ही मुलांसोबत अनेकदा वेळ घालवताना दिसतो. करिश्माच्या अगोदर संजयने डिझाइन नंदिता महतनीसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फक्त 2 वर्षच टिकलं आणि 2003 मध्ये यांनी घटस्फोट घेतला.
तसेच 42 वर्षांची प्रिया सचदेव देखील दुसऱ्यांदा आई होत आहे. प्रियाने या अगोदर बिझनेसमन विक्रम चटवालसोबत लग्न केलं होतं. प्रिया आणि विक्रम यांची एक मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रिया सात महिन्यांची गरोदर असून ती डिसेंबरमध्ये जुळ्यांना जन्म दिलं आहे. आता करिश्मा कपूरचं नाव बिझनेसमन संदीप तोशनीवालसोबत जोडलं गेलं आहे. संदीपने गेल्यावर्षी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर अशी चर्चा आहे की, हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत.