मुंबई : करिश्मा तन्नाने बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. याआधी करिश्मा आणि वरुणच्या मेहंदी आणि हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यांना खूप पसंती मिळत होती. आता हे कपल सात जन्मासाठी एकमेकांचे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये करिश्मा तन्ना गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. दागिन्यांनी सजलेला करिश्माचा ब्राइडल लूक व्हायरल होत आहे. याचबरोबर  वरुण बंगेरा पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबत तिने करिश्माच्या लेहेंग्याला जुळणारी गुलाबी रंगाची पगडी घातली आहे. दोघांचा हा फोटो प्रचंड लाईक आणि शेअर केला जात आहे.


सोशल मीडियावर फोटो व्हायरल
याआधी करिश्मा तन्नाने इन्स्टाग्राम अकाउंटवर मेहंदी आणि हळदी समारंभाचे अनेक फोटो शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं, मेहंदी है.  करिश्मा आणि वरुणची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.  



विशेष म्हणजे करिश्मा तन्ना शेवट 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय करिश्मा अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. तिने 'नच बलिये', 'बिग बॉस 8', 'झलक दिखला जा' आणि 'खतरों के खिलाडी 10' मध्ये भाग घेतला होता. करिश्मा तन्ना 'संजू' चित्रपटात देखील दिसली होती यामध्ये तिने रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत काम केलं होतं.