Karishma Tanna : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना ही सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीच चर्चेत आहे. तिची 'स्कूप' ही सीरिज 2 जून रोजी नेटफ्लिक या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. करिश्माला तिच्या नागिन या मालिकेसाठी ओळखतात. करिश्मा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच करिश्मानं एक खुलासा केला की तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिचा चेरहा सुद्धा पाहिला नव्हता. तिच्या आईनं तिला सांगितलं की त्याचं कारण त्यांना मुलगा हवा होता. जेव्हा तिच्या आईनं तिला ही गोष्ट सांगितली तेव्हा तिला वाईट वाटलं होतं. त्यानंतर तिनं ठरवलं की ती तिच्या आई-वडिलांना ते सगळं देईल जे त्यांच्या मुलानं दिलं असतं. याशिवाय तिनं आणखी काही खुलासे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिश्मानं तिच्या आगामी सीरिजच्या निमित्तानं सिद्धार्थ कनन दिलेल्या मुलाखतीत तिनं तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी करिश्मा म्हणाली की तिनं वयाच्या 17 वर्षा छोट्या पडद्यावर पदार्पण केले. बालाजी टेलीफिल्म्सच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. याविषयी पुढे करिश्मा म्हणाली, 'मी मोठी झाल्यानंतर माझ्या आईनं मला सांगितलं होतं की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील आनंदी नव्हते. कारण त्यांना मुलगा हवा होता. इतर गुजराती कुटुंबांप्रमाणे त्यांच्यावर इतरांचा दबाव होता. त्यांना असं वाटायचं की एक मुलगाच त्यांच्या वंशला पुढे घेऊन जाऊ शकतो. खूप जास्त कमाई करु शकतो. माझे आजी-आजोबा आम्हाला चांगली वागणूक देत नव्हते. या गोष्टीमुळे मी खूप शिकले आणि मी ठरवले की एक दिवस मी यांना एक मुलगा जे करतो ते एक मुलगी देखील करू शकते हे दाखवेन.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : अजमेर शरीफपासून 185 सदस्यांच्या कुटुंबापर्यंत; पाहा एका चित्रपटासाठी कुठेकुठे पोहोचली Sara Ali Khan


पुढे या विषयी सविस्तर सांगत करिश्मा म्हणाली, 'जेव्हा माझा जन्म झाला होता, तेव्हा माझ्या आईनं एक आठवडा माझा चेहरा पाहिला नव्हता. तर माझे वडील एक महिना उलटून गेला तरी मला रुग्णालयात पाहायला आले नव्हते. कारण त्यांना दुसरी पण मुलगीच झाली. जेव्हा माझ्या आईनं मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. असं नाही की माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम नव्हतं. याचं कारण त्यांना दुसरी मुलगी झाली आणि त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचं प्रेशर होतं. त्यामुळे ते मला भेटायला आले नव्हते. हे सगळं ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. हे असं होतं की मला मुली आवडत होत्या पण माझ्या कुटुंबामुळे मी तिला भेटू शकत नव्हतो. या मुलीला देखील चांगली वागणूक मिळणार नाही. त्यात मी काय करू. त्यानंतर मी काही तरी करुन दाखवणा आणि एका मुलगा जे काही करतो ते करण्याचा निर्णय घेतला. मी मुलगा होऊन दाखवेन.