मुंबईः अभिनेत्री करिश्मा कपूरने नुकतीच इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. खरंतर करिश्मा कपूरने इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन केलं होतं. यादरम्यान करिश्माच्या चाहत्यांनी तिला अनेक मजेदार आणि वैयक्तिक प्रश्नही विचारले, ज्याची दिलखुलास उत्तरं करिश्मानं दिली. यादरम्यान लोकांनी करिश्मा कपूरला तिचे आवडते खाद्यपदार्थ, आवडते स्टार्स, आवडता रंग कोणता असे प्रश्न विचारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या 'आस्क मी एनिथिंग' सेशनदरम्यान, करिश्मा कपूरला रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये कोण जास्त आवडते हे देखील विचारण्यात आले.  या प्रश्नाच्या उत्तरात करिश्मानं 'दोघं आवडतात असं उत्तर दिलं, तर तिचा आवडता पदार्थ बिर्याणी आणि आवडता रंग काळा हा असल्याचंही करिश्मानं सांगितलं.



'आस्क मी एनिथिंग' सुरू असताना तिच्या एका चाहत्याने अभिनेत्रीला अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला, प्रश्न होता,  ती पुन्हा लग्न करणार का? 



या प्रश्नाच्या उत्तरात करिश्माने एक गोंधळलेला GIF शेअर केला आणि लिहिले की 'डिपेंड्स' म्हणजे ते अवलंबून आहे. असं फार कमी वेळा घडले आहे जेव्हा करिश्मा तिच्या भूतकाळाबद्दल बोलली असेल.



रणबीर आणि आलियाच्या लग्नात सुद्धा आलियाचा कलिरा करिश्माच्या डोक्यावर पडल्याने करिश्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं.



करिश्माने 2003मध्ये दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. मात्र, 2014 साली करिश्मा आणि संजयचं लग्न तुटलं आणि 2016 मध्ये करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला.



 संजय आणि करिश्मा यांना मुलगी अदारा आणि मुलगा कियान ही दोन मुलं झाली. मुलांसोबतचे फोटो करिश्मा नेहमी शेअर करत असते.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांवर खूप गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे हा घटस्फोट खूप चर्चेत आला होता.