मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहून तिच्या वैयक्तिक जीवनाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून  चाहत्यांशी संपर्कात राहते आणि दररोज स्वतःचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. आता देखील करिश्माचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या एका फोटोमुळे करिश्मा तुफान चर्चेत आली आहे. फोटोसोबतचं अभिनेत्रीने लिहिलेलं कॅप्शन देखील चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेडरुममधील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'आता देखील वीकेंडमध्ये जगत आहे...' असं लिहिलं. फोटोमध्ये करिश्मा आराम करताना दिसत आहे. तिच्या बेडरुममधील फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि  लाइक्सचा वर्षाव होत आहे. 



करिश्मा कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरच इंडस्ट्रीत पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. करिश्मा अभिनव देव दिग्दर्शित 'ब्राऊन' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 


'ब्राऊन' या वेब सीरिजमध्ये करिश्मासोबत ज्येष्ठ अभिनेत्री हेलनही दिसणार आहे. करिश्माच्या चाहत्यांमध्ये सीरिजबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.