सलमान खानचा 25 वर्षांपूर्वीचा `बीवी नंबर 1` चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
सलमान खान आणि करिश्मा कपूर यांचा `बीवी नंबर 1` हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
Biwi No 1 Re-Release: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. सलमान खानचा प्रत्येक चित्रपट चाहत्यांसाठी खास असतो. सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज देखील त्याचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचे जुने हिट चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहेत. यामध्ये शाहरुख खानसह रणबीर कपूर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
दरम्यान, अशातच आता सलमान खानचे देखील नाव जोडले गेले आहे. सलमान खानचा 25 वर्षांपूर्वीचा 'बीवी नंबर 1' हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
'बीवी नंबर 1' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार
सलमान खान, करिश्मा कपूर आणि सुष्मिता सेन यांचा 'बीवी नंबर 1' हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. 1999 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा कॉमेडी चित्रपट आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. पण जुन्या चित्रपटाचा ट्रेलर कधीच रिलीज होत नाही असं तुम्ही म्हणाल. पण प्रथमच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
'बीवी नंबर 1' या दिवशी होणार प्रदर्शित
निर्मात्यांनी 'बीवी नंबर 1' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. त्यानंतर या चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर यांचा 'बीवी नंबर 1' हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या पेजवर 'बीवी नंबर 1' चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील देण्यात आली आहे.
'बीवी नंबर 1' चित्रपटाची कमाई
हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. 25 वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 12 कोटी रुपये होते. 1999 मध्ये या चित्रपटाने 25.55 कोटींची कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 49.77 कोटींची कमाई केली होती.