चित्तोड : पद्मावती सिनेमाला विरोध करण्याचा सिलसिला राजस्थानात आजही सुरूच आहे. आज विरोधाची धार वाढवण्यासाठी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणी पद्मावतींचं निवासस्थान असणाऱ्या चित्तोडगडचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद केले आहे. 


१६ हजार महिलांनी केला होता जोहार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळपासून चित्तोडगडमध्ये बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दरवाज्यावरून परत जावं लागत आहे. राणी पद्मावतींनी याच चित्तोडगडमध्ये 16 हजार महिलांसह जोहार केला होता.


करणी सेनेनं भन्साळींच्या पद्मावती सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आज सकाळपासून अनेक महिलाही आंदोलनात सामील झाल्या आहेत. 


दीपिका, रणवीरच्या घराची सुरक्षा वाढवली


मुंबईतही पद्मावती सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदुकोण तसेच अभिनेता रणवीर सिंह यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, करणी सेनेने दीपिकाला दिलेल्या धमकीनंतर सुरक्षेत ही वाढ करण्यात आली आहे.