मुंबई : 'पद्मावत' सिनेमा पाहिल्यानंतर करणी सेनेनं हिरवा कंदील दिला... पण, अजूनही त्यांच्या मनात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल असलेला राग घर करून राहीलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लीला भन्साळी यांना आता त्यांच्याच पद्धतीनं प्रत्यूत्तर देण्यासाठी आपण भन्साळी यांच्या आई 'लीला' यांच्या नावावर सिनेमा बनवणार असल्याचं करणी सेनेनं जाहीर केलंय.


आणखी वाचा : 'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'


'अभिव्यक्तीचा धडा'


'पद्मावत'ला विरोध करताना करणी सेना सपशेल अपयशी ठरलेली दिसतेय. त्यानंतर आता 'लीला की लीना' नावाचा सिनेमा बनवून संजय लीला भन्साळी यांना 'अभिव्यक्ती'चा धडा शिकवणार असल्याचं करणी सेनेनं म्हटलंय. 


आणखी वाचा : पद्मावत हाऊसफुल , पहिल्या दिवशी किती कमाई?


'आई'चा अपमान


संजय लीला भन्साळी यांनी आपच्या आईचा 'पद्मावती'चा अपमान केलाय. आम्हीही असा सिनेमा बनवू की संजय लीला भन्साळी यांनाही त्याच्यावर गर्व होईल. देशात अभिव्यक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे तर तो आमच्याकडेही आहे, अशी सुडाची भाषा करणी सेनेनं केलीय.


याच वर्षी होणार प्रदर्शित


चित्तोडगढमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलंय. सिनेमाचं कथानक लिहिण्याचं काम सुरू झालंय येत्या १५ दिवसांत सिनेमाचा मुहूर्तही होईल, अशीही माहिती त्यांनी दिलीय. या सिनेमाचं दिग्दर्शन अरविंद व्यास करणार आहेत.