मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील वाऱ्यासारख्या पसरत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्सपैकी हे दोघे एक आहे. एकमेकांसोबत फिरण्यापासून ते त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यांची प्रत्येक लहान-मोठी गोष्ट चाहत्यांना आकर्षीत करत असते.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कर्तिकने सारा सोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीत कार्तिकला सारासह काम केल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, 'साराकडे सकारात्मक ऊर्जा आहे. ती सकारात्मक ऊर्जा स्क्रिनवर उतरते. त्यामुळे मला तिच्यासह पुन्हा काम करायला मला आवडेल.'


दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक याठिकाणी उपस्थित होता. दोघांनी नुकताच इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. चित्रीकरणानंतरही हे दोघे एकमेकांसोबत दिसतात. 


कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.