मुंबई : २०१९ साल आपल्या नावावर नोंदवण्यासाठी अनेक नवनव्या जोड्या बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी सज्ज झाल्यात. यातीलच पहिलं नाव आहे अभिनेत्री कृती सेनन आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचं... ही नवी जोडी 'लुका छुपी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतेय. या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर आज ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय... आणि हा ट्रेलर पाहून या सिनेमात एका वेगळ्याच ट्रॅकवरची लव्हस्टोरी पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांची खात्री झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात लिव्ह इन रिलेशनशीप आणि लग्न हे या सिनेमाच्या कथानकाच्या केंद्रस्थानी असलं तरी त्यातही एक छोटा ट्विस्ट आहे. कृति आणि कार्तिक आर्यन या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत अनेक ओळखीचे चेहरेही दिसणार आहेत. अपारशक्ती खुराना, विनय पाठक आणि पंकज त्रिपाठी यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.



१ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय तर दिनेश विजान यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय.