मुंबई : काही दिवसांपूर्वीपासून सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या अफेअरची चर्चा रंगली. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन दोघंही आपापल्या कामात व्यस्त आहेत. या दोघांनी आपल्या करिअरकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. दोघांनी करिअरकडे फोकस केलं असून वेगळं होण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा रंगली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, पहिल्यांदा कार्तिक आर्यनने सारा अली खानच्या ब्रेकअपच्या चर्चांवर चुप्पी तोडली आहे. कार्तिकने याबाबत पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक आर्यनची अनन्या पांडेसोबतची डेट या सगळ्याला कारणीभूत ठरल्याचं देखील म्हटलं जातं होतं. 



'स्टूडंट ऑफ द ईअर 2' या करण जोहरच्या सिनेमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अनन्या पांडेने 30 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसादिवशी कार्तिक आर्यन आणि अनन्या डिनर डेटला गेले होते. ज्यानंतर अनन्यामुळे कार्तिक-सारामध्ये दरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. 



एका कार्यक्रमात कार्तिकला सारा आणि त्याच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कार्तिकने उत्तर दिलं की, 'दो रोटियां अनन्या के साथ तोड ली तो सबने पुछ लिया'. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक जाहिरात शूट केली त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला तेव्हा कुणीच काही विचारलं नाही.