कार्तिक आर्यनच्या मिठीत रडणारी ती मुलगी कोण? व्हिडिओमुळे एकच चर्चा
कार्तिक आर्यन सध्या त्याचा नवीन चित्रपट `भूल भुलैया 2` च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा नवीन चित्रपट 'भूल भुलैया 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या लॉन्चसाठी दिल्लीला पोहोचला. पण यादरम्यान एक मुलगी कार्तिकला मिठी मारुन रडायला लागली. कार्तिकचा हा व्हिडिओही समोर आला आहे.
कार्तिक आर्यनला पाहून फॅन रडू लागली
कार्तिक आर्यनची खूप मजबूत फिमेल फॅन फॉलोइंग आहे. त्याची एक झलक पाहण्याची त्याच्या चाहत्या उत्सुक असतात. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे. यादरम्यान कार्तिक आर्यनची एक चाहती त्याला पाहून रडू लागते.
कार्तिकने मुलीला अशा प्रकारे केलं शांत
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी रडत खाली बसते. त्यानंतर कार्तिकही तिचा हात धरतो आणि गुडघ्यावर बसतो. आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर मुलगी कार्तिकला मिठी मारते. त्याचबरोबर, कलाकार देखील मुलीला शांत करताना दिसत आहेत. कार्तिकचा हा स्वभाव खूप पसंत केला जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.