मुंबई : ज्या-ज्यावेळी  फिल्म इंडस्ट्रीच्या सगळ्यात आघाडीच्या अभिनेत्यांचा नाव घेतलं जातं. तेव्हा-तेव्हा त्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) चं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. 'प्यार का पंचनामा'च्या या अभिनेत्याला त्याच्या अभिनयामुळे ओळखलं जातं. तेवढंच त्याच्याबद्दल लोकांना त्याच्या पर्सनल लाईफबद्दलही माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक आर्यन सैफ अली खान (Saif Ali Khan)ची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan)ला डेट करत होता. मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र कार्तिक लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सुरु असलेली ही चर्चा खरंच खरी आहे का? याबद्दल नुकताच स्वत: कार्तिकने खुलासा केला आहे आणि आपल्या लग्नाच्या प्लान्सबद्दल डिटेलमध्ये सांगितलं आहे.


लग्नबंधनात अडकणार कार्तिक आर्यन?
कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा फ्रेडी (Freddy Kartik Aaryan) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये तो अलाया एफ  (Alaya F) सोबत दिसला आहे. या सिनेमाला खूप छान रिव्यूज मिळाले आहेत. आणि हा सिनेमा डिज्नी त्याचबरोबर हॉटस्टारवर पाहिला जाऊ शकतो. या सिनेमाच्या संबधित दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनने आपल्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 


Kartik Aaryan म्हणाला माझ्या आयुष्यात प्रेम
या मुलाखतीत जेव्हा कार्तिक आर्यनला विचारलं गेलं की, लग्नाला घेवून अभिनेत्याचे काय प्लान्स आहेत. आणि तो कधी कोणासोबत लग्न करु शकतो. यावर अभिनेत्याने सांगितलं की, अद्याप तरी त्याच्यावर घरुन कोणतंच प्रेशर नाहीये. आणि त्याच्या आईला वाटतं की, कार्तिकने तीन-चार वर्ष कामावर लक्ष द्यावं. कार्तिकने मुलाखती दरम्यान हे देखील सांगितलं की, माझ्या आयुष्यात प्रेमासाठी जागा आहे. आणि तो त्याच प्रतिक्षेत आहे की, तो कधी प्रेमात पडेल.