Kartik Aryan Juhu Property: कार्तिक आर्यन हा आजचा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. सध्या सेलिब्रेटी आपल्या नव्या विकत घेतलेल्या घराबद्दल आनंदाने सांगताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. मध्यंतरी काही सेलिब्रेटींनी त्यांच्या गृहप्रवेशाच्या पूजेचे फोटोही व्हायरल केले होते. त्यामुळे त्यांचीच चांगलीच चर्चा रंगली होती. आता अभिनेता कार्तिक आर्यननं 17 कोटींचे घर विकत घेतले असल्याची बातमी समोर येते आहे. त्यामुळे सध्या त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नक्की त्यानं हा फ्लॅट कुठे घेतला आहे याची त्याच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या या आलिशान घराबद्दल. कार्तिक आर्यनच्या या नव्या घराविषयी तुम्हाला काय माहिती आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या 'सत्यप्रेम की कथा' हा त्याचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे सध्या कार्तिक आर्यनचं नावं हे सुपरस्टार्सच्या लिस्टमध्ये गेलं आहे. त्यामुळे सध्या त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासोबत त्याच्या लक्झरीयस गाड्यांचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. आता याच सगळ्या चर्चांमध्ये त्यानं एक नवं घरं विकत घेतलं आहे. ज्याची किंमत 17.50 कोटी रूपये इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यननं जुहूमध्ये 1,594 स्केअर फूटचं अपार्टमेंट विकत घेतलं आहे. त्याचे हे घर सिद्धिविनायक बिल्डिंगमध्ये आहे. याच कॅम्पसमध्ये 'प्रेसीडेंसी सोसायटी' पण आहे. यातच कार्तिक आर्यनचं एक घर आहे. कार्तिक आर्यन आपल्या कुटुंबासोबत येथे राहतो आहे. 


हेही वाचा - जुन्या आठवणींमध्ये रमली प्रिया बापट; ''आमची क्रश...'' म्हणत नेटकरी नॉस्टॅलजिक!


कार्तिक आर्यननं ही जागा प्रति स्केअर फूट 1.10 लाख रूपयांना खरेदी केला आहे. त्याशिवाय त्यानं कार पार्किंगही खरेदी केली आहे. डिसेंबरपासून तो एक नवं घरं विकत घेतो आहे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानं शाहिद कपूरचा जुहू तारा रोडला असलेला प्रणेता अपार्टमेंटचं घर भाड्यानं घेतलं होतं. त्यासाठी त्यानं 36 महिने लीज केले होते. 


सध्या कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानं चागंली कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 10 कोटीही कमावू शकला नव्हता. तर आता 9 दिवसांत या चित्रपटानं 55 कोटी 91 लाख रूपये कमावले आहेत. त्यामुळे सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे.