मुंबई : अभिनेता इरफान खान, मराठमोळी अभिनेत्री आणि यूट्यूब सेन्सेशन मिथिला पालकर आणि दुलकर सलमान अशी स्टारकास्ट घेऊन 'कारवाँ' येतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. स्वत:च्याच शोधात असलेल्या तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिकेत हे तीघे या सिनेमात दिसत आहेत. इरफानचा वेगळा अंदाच आणि गंभीर तरीही खोडकर मिथिला या सिनेमात पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाची कहाणी दोन मृतदेहांभोवती फिरते... एकमेकांना याआधी कधीही न भेटलेल्या, पाहिलेल्या लोकांशी या तिघांची भेट त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देते, असं काहीसा या सिनेमाचा गाभा... 


'कप साँग' फेम मिथिला पालकर या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलंच पाऊल टाकतेय. आकर्ष खुराना यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'कारवाँ'