मुंबई : कॅन्सरग्रस्त बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा आगामी सिनेमा कारवाँ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर छोटा का फसाना हे गाणे रसिकांच्या भेटीला आले. याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित झाल्यावर लगेचच हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


ही आहे गाण्याची खासियत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोचीमध्ये चित्रीत झालेल्या या गाण्याच्या बोल प्रतिक कुहाडने लिहिले आहे. तर प्रतिकनेच ते गायले आणि संगीतबद्ध केले आहे. या गाण्यातून आयुष्यातील अनुभव कथित केले आहेत.


सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित


कारवाँ सिनेमात इरफान खान, दलकीर सलमान आणि मिथिला पालकर प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा ३ ऑगस्टला प्रदर्शित होईल. या सिनेमाचे दिग्दर्शन अक्षर खुरानाने केले आहे.


इरफानवर उपचार सुरु


मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार दलकीर सलमानचा हा पहिला सिनेमा आहे. यात मिथिला पालकर प्रमुख भूमिकेत आहे. तर इरफान खान लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन ट्युमर या गंभीर आजारावर उपचार घेत आहे.