Kasautii Zindagi Kay फेम अभिनेत्याचं निधन, अखेरची पोस्ट VIRAL
Kasautii Zindagi Kay Actor Death : `कसोटी जिंदगी की` मालिकेतील अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास...
Kasautii Zindagi Kay Actor Death : छोट्या पडद्यावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता विकास सेठी आता या जगात नाही. विकासनं वयाच्या 48 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. या विषयी त्यांची पत्नी जान्हवी सेठीनं बातमी दिली आहे. त्याचं निधन कार्डियक अरेस्टनं झाल्याचे त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
आज 8 सप्टेंबर रोजी रविवारी विकासनं अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विकास झोपला होता आणि सकाळी जेव्हा तो नाही उठला, तेव्हा त्याची बायको त्याला लगेच रुग्णालयात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सूत्रांनुसार, विकास गेल्या काही काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होता. त्याला बऱ्याच काळापासून काम मिळत नव्हतं. तर इंडस्ट्रीच्या काही मित्रांसोबत देखील संपर्कात नव्हते. छोट्या पडद्याशिवाय विकासनं करण जोहरचा चित्रपट 'कभी खुशी कभी गम' मध्ये रॉबीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. विकास सेठी हा 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं 'कहीं तो होगा', 'ससुराल सिमर का', 'गुस्ताख दिल' आणि 'उतरन' सारख्या अनेक शोमध्ये काम केलं. तो जेव्हा ही कधी कोणत्या शोमध्ये दिसला. त्यानं त्याच्या किलर लुक्स आणि दमदार अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली.
2018 मध्ये त्यानं जान्हवी सेठीशी लग्न केलं. त्यानंतर जान्हवीनं जुळ्या मुलांना जन्म दिला. तो सोशल मीडियावर खूप उत्साही होता. त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत तो अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. खरंतर चार महिन्यांपासून त्यानं सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही. 12 मे रोजी त्यानं अखेरची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी त्यानं ही खास पोस्ट मदर्स डेच्या निमित्तानं केली होती.
विकास सेठीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो त्याच्या आईसोबत दिसला. या पोस्टमध्ये नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही खूप लवकर गेलास.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'विश्वास होत नाही. देव तुझ्या आत्म्याला शांती मिळू द्या.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भावपूर्ण श्रद्धांजली.'