मुंबई : 'मैंने प्यार क्यों किया', 'युवराज', 'एक था टाइगर', 'टाइगर जिंदा है', 'भारत', 'नमस्ते लंडन' यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनय करत अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. पण एक दिवस आला जेव्हा ती एक चूक कतरिनाच्या जीवावर बेतली असती. एका मुलाखतीत कतरिना म्हणाली, एकदा ती चॉपर हेलिकॉप्टरवर होती. अचानक काहीतरी झालं आणि हेलिकॉप्टर खालच्या दिशेने उतरु लागला. तेव्हा कतरिना प्रचंड घाबरली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना म्हणाली, 'त्यावेळी मला वाटले की आता सर्व काही संपल आहे. माझं आयुष्य आता संपेल...'. त्या वेळी कतरिनाची प्रकृती खूपच वाईट होती, पण तरीही ती फक्त आईचाच विचार करत होती. आई बरी होवो अशी ती प्रार्थना करत होती.



त्यावेळी कतरिनाचा काळ तिच्या जवळ आला होता, पण वेळ आली नव्हती. अनेक संकटांवर मात करुन आज कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करत आहे. 


बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, कतरिना कैफ एक मॉडेल होती. तिने अनेक नामांकित ब्रँड आणि डिझाइनरसाठी मॉडेलिंग केलं. कतरिना कैफही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. रणबीर कपूर ते सलमानसोबत त्याचे अफेअर होते.