Kate Winslet Photo Then and Now: 'टायटॅनिक' हा चित्रपट आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे आपण हा चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहतो. या चित्रपटातून किट विन्सलेट आणि लिओनार्डो डायकॅपरिओ यांची केमेस्ट्री समोर आली होती. 1997 साली हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्याचसोबत या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगली पसंती दर्शवली होती. केट विन्सलेट तेव्हा अत्यंत तरूण आणि आकर्षक होती. परंतु आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन 26 वर्षे होऊन गेली आहेत. म्हणता म्हणता इतकी वर्षे झाली हा विचार करून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता केट विन्सलेटही मोठी झाली आणि तिच्यातही बदल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता केट विन्सलेट ही फार वेगळी दिसते आहे. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यातही बदल झाले आहेत. मध्यंतरी तिचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहून, तिच्या लुकवर आता ती फारच म्हातारी दिसू लागली आहे. अशीही टीका केली होती. केट एलिझाबेथ विन्सलेट असं तिचं संपुर्ण नावं आहे. तिही एका फिल्मी घरातल्या फॅमिलीपासून आलेली आहे. 1994 सालापासून ती हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ती आता 'अवतार 2' च्या निमित्तानं तिचा आगळावेगळा रोल यातून पाहायला मिळाला. त्यावेळीही तिचे अनेक फोटो हे व्हायरल झाले होते.


हेही वाचा - पाहा सर्वाधिक सर्च केलेले Jobs कोणते? तुम्हीही शोधता ना हीच नोकरी... 


आता केट फार बदलली आहे. ती आईही आहे. त्यामुळे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही ती योग्य पद्धतीनं पार पाडते आणि त्याचबरोबर ती आपलं प्रोफेशनल लाईफही सांभाळून आहे. तिची आणि लिओनार्डो डीकेपरिओची आजही चर्चा होताना दिसते. सोबतच त्यांच्या दोघांच्या अफेअरच्याही बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या. 



जेव्हा केट विन्सलेट हॉलिवूडमध्ये तेव्हा सुप्रसिद्ध होती तेव्हा भारतात माधुरी दीक्षितची हवा होती. पाहायला गेलं तर वयानं माधुरी दीक्षित मोठी असली तरी त्या समकालीनच. परंतु जेवढी माधुरीची जगभरात चर्चा व्हायची तेवढीच चर्चा ही केट विन्सलेटही व्हायची. आज त्या दोघींची चर्चा होताना दिसते. इतक्या या अभिनेत्री लोकप्रिय आहेत. परंतु वर्षे सरली त्याप्रमाणे रूपातही बदल होतात त्याचप्रमाणे या दोघींच्याही रूपात प्रचंड बदल झाला आहे. केटची तुलना अनेकदा मधुबालाशीही व्हायची. परंतु आता केट पुर्णत: बदलती असली तरीसुद्धा तिच्या सौंदर्यात मात्र अद्यापही कमतरता जाणवत नाही.