मुंबई : बॉलिवूड स्टार्स कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आहेत. जरी दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला नसला, तरी हे जोडपे मीडियाच्या नजरेपासून त्यांचे प्रेम लपवू शकले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड स्टार कतरिना कैफने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. पाश्चात्य सभ्यतेत वाढलेल्या या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने भारतीय अभिनेत्रींनाही पराभूत केले आहे. कतरिनाच्या सौंदर्यामुळे केवळ दबंग खानच तिच्या जवळ आला नाही, तर रणवीर कपूरसोबतचे तिचे नातेही बऱ्याच काळापासून चर्चेत राहिले. 


पण रणवीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सध्या सुपरस्टार विकी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.


त्यांची वाढती जवळीक पाहून अलीकडेच या जोडप्याच्या साखरपुड्याची बातमी समोर आली होती. ज्यात असे सांगितले जात होते की दोघांनीही  गुपचूप साखरपुडा केला आहे. त्यानंतर ही केवळ एक अफवा असल्याचे सांगण्यात आले. पण आता हे देखील ऐकले जात आहे की, साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झालं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याच्या प्रकरणावरून एकमेकांसोबत जोरदार भांडणे झाली आहेत. सांगितले जात आहे की दोघेही साखरपुड्याच्या बातमीमुळे खूप रागावले होते.


सध्या कतरिना टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या भांडणानंतरच ती सलमान खानसोबत रशियाला रवाना झाली. तिचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रशियाला जाण्यापूर्वीच ही बातमी आली, विकी आणि कतरिना लग्न करणार असल्याची देखील चर्चा रंगली होती.


दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत पण या नात्याला नवीन नाव देण्याऐवजी त्यांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.