700 वर्ष जुन्या किल्ल्यात Vicky Kaushal आणि Katrina Kaif बांधणार लग्नगाठ !
कतरिना कैफ आणि विकी कौशल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे अशी एकच चर्चा सुरु झाली आहे. कतरिना आणि विकी कौशल यांचे एका फक्शनमधील काही फोटो याआधी समोर आले होते. ते तुफान व्हायरल होताच या जोडीनं साखरपुडा केल्याचं बोललं जात होतं. पण कतरिनाने या सर्व अफवा असल्याचं सांगत ही चर्चा खोटी असल्याचं म्हटलं होतं.
त्यानंतर कतरिना आणि विकीला पुन्हा एकत्र स्पॉट करण्यात आलं. विकी कौशलच्या फिल्म स्क्रिनिंगवेळी दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर बॉलिवूड निर्मातीच्या भेटीला ही जोडी एकत्र पोहोचली होती.
आता ही जोडी लग्नाची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. कतरिना तिच्या वेडिंग ड्रेससाठी विशेष मेहनत घेत आहे. लग्नाची तारिख ठरली असून डिसेंबरच्या 7 ,8 आणि 9 तारखेला हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
राजस्थानच्या ऐतिहासिक किल्ल्यात ही जोडी विवाह करणार आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणी 700 वर्ष जुना किल्ला आहे.
हा किल्ला खास या बॉलिवूड कपलच्या लग्नासाठी सजवण्यात येणार आहे. याआधी देसी गर्ल प्रियांका चोप्राने ही ऐतिहासिक ठिकाणी विवाह करण्याला प्राधान्य देत शाही विवाहसोहळा पार पाडला होता.