विकीशिवाय एक ही क्षण दूर राहू शकत नाहीये कतरिना, त्या व्हिडिओमुळे एकच चर्चा
कतरिना कैफही लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाली आहे
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतर त्यांच्या कामाला पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. दोघांनी डिसेंबरमध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न केले आणि त्यानंतर हनीमूनसाठी मालदीवला रवाना झाले.
आता दोघेही त्यांचे आगामी प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरमध्ये आहे. दरम्यान, कतरिना कैफही लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाली आहे. ती नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली.
असे म्हटले जात आहे की कतरिना कैफ इंदौरला रवाना झाली आहे, जिथे विकी कौशल सध्या सारा अली खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावेळी कतरिनाने काळ्या रंगाची हुडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती. यादरम्यान ती कोरोना प्रोटोकॉल फॉलो करताना दिसली.
जेव्हा कतरिना मुंबई विमानतळावर दिसली तेव्हा तिने मास्क आणि फेस शील्ड घातले होते. यापूर्वी कतरिना पती विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. आता विकी शुटींगसाठी जिथे गेला आहे तिथे त्याला भेटण्यासाठी कतरिना जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कतरिना विकीपासून एक ही क्षण दूर राहू शकत नाहीये असंच दिसतंय.
कोरोनाची वाढता प्रादुर्भाव पाहता यावेळी दोघांनीही मास्क घातले होते. यावेळी कतरिनाने नारंगी रंगाचा नाईट सूट घातला होता आणि विकी तपकिरी रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसला होता. विकी कारमधून उतरण्यापूर्वी कतरिनाने त्याला मिठी मारली. त्याचवेळी विकी गाडीतून खाली उतरताच गेटच्या दिशेने निघाला.