Vicky - Katrina : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, जे चाहत्यांना कायम कपल गोल्स देत असतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (vicky kaushal). अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी (Vicky - Katrina) लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आज दोघे वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दरम्यान दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता कतरिनाने वैवाहिक जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. (vicky katrina togther)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक मुलाखतीत कतरिनाने लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदललं असल्याचं कबूल केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, 'आयुष्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न. तुम्ही एका व्यक्तीसोबत आयुष्य घालवता, त्या व्यक्तीसोबत राहता, प्रत्येक गोष्ट शेअर करता. या सगळ्या गोष्टी फार सुंदर आहेत.'


पुढे अभिनेत्री म्हणाली, 'कामा निमित्त विकी माझ्यापासून दूर असतो, कधी मी त्याच्यापासून दूर असते. आम्ही एकाच क्षेत्रातील असल्यामुळे शुटिंगसाठी आम्ही कायम बाहेर असतो. म्हणून मला विकीसोबत जास्त वेळ घालवायला मिळत नाही. पण माझ्या आयुष्यतील त्याचं स्थान खास आहे.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. (vicky kaushal and katrina kaif movie)


कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2021 मध्ये लग्न केले. आता कतरिना लवकरच ‘फोन भूत’  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (vicky kaushal wife age)



कतरिना सध्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच कतरिना सलमानच्या ‘टायगर 3’मध्येही झळकणार आहे. (vicky kaushal and katrina kaif marriage date)