संजय लीला भन्साळींच्या भेटीसाठी कतरिनाने घेतला इतका महागडा ड्रेस
तर कतरिनाने यावेळी घातलेल्या ड्रेसची देखील तितकीच चर्चा रंगते आहे.
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफला नुकतच बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या मुंबईतील ऑफिसमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी कतरिनाने पिवळ्या रंगाचा रेड प्रिंट असलेला गाऊन घातला होता. हा ड्रेस लंडनमधील एका प्रसिद्ध ब्रॅण्डचा आहे. कतरिनाचा हा लूक अगदी कॅज्युअल होता.
कतरिनाने संजय लीला भन्साळी यांची ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतल्याने तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
तर कतरिनाने यावेळी घातलेल्या ड्रेसची देखील तितकीच चर्चा रंगते आहे. त्याचं कारण म्हणजे कतरिनाच्या या ड्रेसची किंमत तब्बल 15 हजार रुपये इतकी आहे.या ड्रेसवर मॅचिंग अशी लाल रंगाची फ्लॅट सँडल यावेळी कतरिनाने कॅरी केली होती.
कामानिमित्त बाहेर पडलेल्या कतरिनाने कोरोनाचे निर्बंध पाळत N-95 मास्क घातला होता.
कतरिनाच्या इतर प्रोजेक्टबद्दल सांगायंच झालं, तर सलमान खानसोबत कतरिना एक था टायगर सिनेमाच्या तिसऱ्या सिरीजवर काम करत आहेत. पुन्हा एकदा टायगर आणि झोयाची ही जोडी ऑन स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे