मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच चर्चा होत असतात. सोशल मीडियावर सलमान आणि कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात कतरिना कैफला रडताना पाहून सलमान बैचेन झालेला व्हिडीओत दिसतोय. रडणाऱ्या कतरिनाच्या चेहऱ्यावर कसे हसू आणता येईल याचा प्रयत्न सलमान करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान आणि कतरिना एका रिअॅलिटी शोमध्ये गेले होते. यावेळी शोमधील एका स्पर्धकाने सलमानच्या तेरे नाम या गाण्यावर परफॉर्म केले. जे पाहून कतरिना भावूक झाली आणि रडायला लागली. कतरिनाला रडताना पाहून सलमान मात्र बैचेन झालाय. अश्रू पुसण्यासाठी सलमान तिला टिश्यू देतो. तसेच तिला कसे हसवता येईल याचाही प्रयत्न करताना तो व्हिडीओत दिसतोय. 


कतरिनाला हसवण्यासाठी सलमान डायलॉग विसरण्याची अॅक्टिंग करतो. सलमान म्हणतो, उफ्फ कैटरीना, ”रो मत, ठीक है, आई हेट टियर्स। वो कौन सा डायलॉग है?  यानंतर कतरिना हसायला लागते. 



कतरिना आणि सलमान नुकत्याच टायगर जिंदा है या सिनेमात एकत्र दिसले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. रणबीर कपूरशी कतरिनाचा ब्रेकअप झाल्यानंतर प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत सगळ्यात सलमान तिला साथ देतोय.