मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. बऱ्याचदा ती विकीसोबतच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफ सध्या कामापेक्षा फॅमिलीला जास्त वेळ देत आहे. सध्या सिनेमा आणि शुटींगमधून कतरिनाने ब्रेक घेतला आहे, त्यामुळे कतरिना बॉलिवूड सोडण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न देखील अनेकांना पडू लागला आहे.


त्यातच आता कतरिनाची एक मुलाखत खूपच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत कतरिना बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाबाबत सांगताना दिसत आहे.


कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा नमस्ते लंडन हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. कतरिना कैफने या चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून तिची अक्षयसोबतची जोडी प्रेक्षकांना स्क्रिनवर पाहायला आवडू लागली.


हा चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. नमस्ते लंडनमध्ये ऋषी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. पण तेव्हा अशी चर्चा रंगली होती की हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कतरिनाने बॅग पॅक करून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत खुद्द कतरिनाने खुलासा केला होता.


करण जोहरच्या चॅट शोमध्ये याबाबत कतरिना कैफने खुलासा केला की, "नमस्ते लंडन सिनेमा रिलीज होण्याआधी ती खूपच घाबरली होती.


मला या सिनेमात इतर सिनेमाच्या तुलनेत जास्त सीन्समध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. या सिनेमात मला सर्वात जास्त दिसले होते. त्यामुळे मला भीती वाटू लागली होती की हा सिनेमा चालणार नाही. "



कतरिनाने सांगितले की हा चित्रपट फ्लॉप होईल असे तिला वाटले होते, म्हणून तिला रिलीजपूर्वी बॅग पॅक करून निघून जायचे होते. कतरिनाने सांगितले की, या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मी माझी बॅग भरणार होते आणि नवीन करिअर शोधण्याचा विचार करत होते. पण जेव्हा हा चित्रपट हिट झाला आणि सगळ्यांनी या सिनेमाचं कौतुक केलं, तेव्हा तिला धक्का बसला.