Katrina Kaif च्या बिकिनी फोटोंवर सासऱ्यांची प्रतिक्रिया
कतरिना कैफ, बिकिनी फोटो आणि तिच्या फोटोंवर सासऱ्यांची कमेंट...
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नाआधी दोघे डेट करत असल्याचं देखील फार कमी लोकांना माहिती नव्हतं. पण आता कतरिना आणि विकीच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. लग्नानंतरही प्रत्येक सण दोघांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. आता दोघांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
नुकतांच कतरिना आणि विकी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीवला गेले होते. कतरिनाने मालदीवचे फोटो देखील सोशल मीडियावर देखील पोस्ट केले आहेत.
तिच्या फोटोंवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्स आल्या. एवढंच नाही तर कतरिनाचे सासरे शाम कौशल यांनी देखील कतरिना म्हणजे सूनेच्या फोटोला लाईक केलं आहे.
सध्या कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कतरिनाबद्दल सांगायचं झालं तर ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.