मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान याचा बुधवारी वाढदिवस होता. वयाची ५२ वर्ष पूर्ण करणाऱ्या सलमाने वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर मस्त पार्टी दिली. पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. विशेष म्हणजे पार्टीला सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफची देखील वर्णी लागली होती. 


कतरिनाने दिले हे खास गिफ्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसानिमित्त सलमाने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी कतरिनाने काय गिफ्ट दिले या मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशस्वी करण्यात तिने मोलाचा वाटा उचलला. यापेक्षा दुसरे मोठे गिफ्ट काय असू शकते.



कुटुंबिय आणि जवळची मित्रमंडळी


सलमानच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन २ दिवसांपूर्वीच ठरला. पार्टीला जवळपास ७५ सेलिब्रेटी उपस्थित होते. सलमानच्या बर्थडे पार्टीला खान कुटुंबियातील सर्व सदस्य तसंच मलायका अरोरा, अमृता अरोरा, लूलिया वंतूर यांचीही हजेरी लावली.