नववधूच्या साजात कतरिना कैफ, पण मंगळसुत्राने वेधलं सर्वांचं लक्ष
कतरिनाच्या मंगळसूत्र, अंगठीसाठी विकीचा इतका खर्च
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं. ब्रायडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं आनंद होता. लाल लेहेंगा, केसात गजरा, हातात बांगड्या आणि कपाळावर सजलेली टिकली यासर्व नववधूच्या साजाने कतरिनाच्या सौंदर्यात भर पडली.
कतरिना आणि विकीच्या लग्नाचे कपडे सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केले होते. कतरिनाची ज्वेलरीही सब्यसाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील होती. लग्नाच्या कपड्यांमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. लग्नाच्या ड्रेसमध्ये कतरिनाचं मंगळसूत्र सर्वांचं लक्ष वेधत आहे. तिचं मंगळसूत्र उठून दिसत आहे.
फोटोमध्ये, कतरिना कैफचं एक गोंडस छोटे मंगळसूत्र दिसत आहे. कतरिना कैफने हिऱ्याचं मंगळसूत्र घातलं आहे, जे सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. काळ्या आणि सोन्याच्या मणींनी सजवलेल्या मंगळसूत्राची किंमत जवळपास पाच लाख रूपये आहे.
मंगळसुत्रासोबत कतरिनाच्या दागिण्यांसाठी विकीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. मंगळसुत्रासोबतचं तिच्या अंगठीवर देखील सर्वांची नजर होती. प्लॅटिनममधील कतरिना कैफच्या ब्लू सॅफायर डायमंड एंगेजमेंट रिंगची किंमत 7 लाख 40 हजार 708 रुपये आहे. लग्नानंतर सर्वत्र तिच्या दागिण्यांची आणि लूकची चर्चा रंगली