कतरिना होती `गोल्ड डीगर`? म्हणे... लॉन्ड्रीपासून सगळी बिलं रणबीर भरायचा
Katrina kaif and Ranbir Kapoor : कतरिना कैफ रणबीर कपूरला सांगायाची तिची सगळी बिलं भरायला!
Katrina kaif and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. कतरिनाच्या कामा पेक्षा तिचं खासगी आयुष्य जास्त चर्चेत असतं. कतरिनाचं आता विकी कौशलसोबत लग्न झालं असलं तरी तिचं आणि रणबीर कपूरचं रिलेशनशिप हे टॉक ऑफ द टाऊन होतं. ते दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील राहत होतं. पण हे सगळं विसरून ते दोघं आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की जेव्हा ते सोबत होते तेव्हा कतरिना रणबीरला तिचे सगळे बिल्स भरायला सांगायची.
कतरिना त्याला तिचे सगळे बिल्स भरायला सांगायची आणि त्यात तिचं लॉन्ड्री बिल सुद्धा भरायला सांगायची. रिपोर्टनुसार, जेव्हा लॉन्ड्रीवाल्यानं कतरिनाला तिचं खूप दिवसांचं थकीत असलेलं लॉन्ड्री बिल दिलं तेव्हा तिला खूप राग आला होता. त्या लॉन्ड्रीवाल्यानं तीनवेळी तिला भेटण्याचा प्रयत्न केला आणि अखेर तिसऱ्या दिवशी त्यानं तिच्या हातात बिल दिलं. त्यावेळी कतरिनानं त्याच्या तोंडावर दरवाजा आदळला. त्यानंतर तिनं तिच्या सेक्रेटरीला कॉल केलं आणि सांगितलं की अशी सगळी बिलं ही रणबीरला द्यावी तिला नाही.
दरम्यान, ही पहिली वेळ नाही जेव्हा कतरिनाच्या कंजुष स्वभावाविषयी चर्चा झाली आहे. याआधी देखील असे म्हटले जात होते की सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर देखील ती त्याच्या घरीच राहत होती. अखेर तिला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा तिनं त्याचं घर सोडलं. इतकंच नाही तर अक्षय कुमार आणि सलमान खान या दोघांनी कपिल शर्माच्या शोमध्ये अनेकदा कतरिनाच्या कंजुष स्वभावावर कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा : किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल
कतरिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती आणि सलमान खान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. कतरिना पुन्हा एकदा झोयाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत या चित्रपटात इमराण हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.