Ranveer Singh Trolled : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण हा टॉक शो सध्या चर्चेत आहे. या शोचं आठवं पर्व सुरु आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हे हजेरी लावताना दिसतात. या शोचा पहिला एपिसोड हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. करणच्या या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या खासगी, वैवाहिक आणि प्रोफेश्नल आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इतकंच नाही तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शोच्या माध्यमातून शेअर केला आहे. यावेळी रणवीरनं दीपिकाला प्रपोज करण्याविषयी सांगितलं. पण नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्याची आणि अनुष्का शर्माविषयीच्या त्या वक्तव्याशी तुलना केली आहे.
रणवीरनं याविषयी सांगितलं की कशा प्रकारे त्यानं दीपिकाला प्रपोज केलं आणि याविषयी त्यानं तीन वर्षे सगळ्यांपासून लपवून ठेवलं. पण रणवीरनं जसं त्याच्या मुलाखतीविषयी डिस्क्राइब केलं ते नेटकऱ्यांना पटलेलं नाही. त्यांना काही जुन्या गोष्टी आठवल्या. ज्या रणवीरनं या शोमध्ये आधी देखील एका दुसऱ्या अभिनेत्रीविषयी सांगितल्या होत्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Ladies & gentlemen,#RanveerSingh, the greatest wattpad story writer of our generation.#KoffeeWithKaran8 #KoffeeWithKaran #KoffeeWithKaranS8 pic.twitter.com/gJPjQQzAac
TRENDING NOW
news— Raymond. (@rayfilm) October 26, 2023
'कॉफी विथ करण 8' दरम्यान, रणवीर सिंगनं दीपिका पदुकोणसोबत त्याच्या मुलाखतीविषयी सांगितलं. त्यानं सांगितलं की दीपिकासोबत त्याची पहिली भेट ही संजय लीला भन्साळी यांच्या वर्सोवातील घरी झाली होती. जेव्हा भन्साळी यांच्या घरी राम-लीला या चित्रपटाच्या स्क्रीप्टच्या रीडिंगसाठी गेले होते. तेव्हा मी टेबलजवळ बसलो होतो आणि दरवाजा हा माझ्या समोर होता. संजय लीला भन्साळी यांचं घर हे समुद्राजवळ आहे. तर जसाच त्यांच्या घराचा दरवाजा उघडला आणि समुद्राच्या बाजूनं हवा येत होती. तेव्हाच दीपिका आत येत होते. तिनं पांढरा चिकनकारीचा ड्रेस परिधान केला होता. ती सोज्वळतेचं प्रतिक दिसत होती.
रणवीरनं या शोमध्ये अनुष्काविषयी देखील हेच वक्तव्य केलं होतं. रणवीरचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो याच शोमधील आहे. या शोमध्ये रणवीर दीपिकाआधी अनुष्का शर्मासोबत आला होता. या दरम्यान, रणवीरनं याच ओळी अनुष्कासाठी देखील वापरल्या होत्या. रणवीर या व्हिडीओत त्याची आणि अनुष्काची पहिली भेट याविषयी सांगत आहे. त्याची आणि अनुष्काची पहिली भेट ही यशराज फिल्म्सच्या ऑफिसमध्ये झाली होती.
हेही वाचा : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक करताच म्हणाली...
दरम्यान, रणवीर आणि दीपिकानंतर अभिनेत्याचा अनुष्कासोबतचा तो व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी रणवीर आणि करण जोहरला ट्रोल करत आहेत. एक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला की 'रणवीर भाऊ स्क्रिप्टमध्ये थोडातरी बदल केला असता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अनुष्काचं हावभाव पाहून असं वाटतंय की तो फालतू बोलतोय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांची पीआर टीम आता हे सगळं पाहून विचारात पडली असेल.'
IND
(80.2 ov) 314/4 (113 ov) 471
|
VS |
ENG
465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.