जेव्हा कॅटरिना कैफही सलमान खानची नक्कल करते....
`एक था टायगर` या चित्रपटाचा सिक्वेल `टायगर जिंदा है` हा लवकराच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' हा लवकराच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातून पुन्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी एकत्र रोमॅन्स आणि अॅक्शनपट करताना दिसणार आहे. त्यामुळे फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता आहे.
'टायगर जिंदा है' च प्रमोशन जोरात
'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पुढील महिन्यात २२ डिसेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या त्याच्या प्रमोशनसाठी सलमान आणि कॅटरिना एकत्र फिरत आहे.
इंडियन सुपर लीग च्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थिती
नुकतीच सलमान आणि कॅटरिनाने इंडियन सुपर लीग च्या उद्धाटन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळेस ग्राऊंडवर रसिकांशी भेटताना सलमानपाठोपाठ कॅटरिना चालत होती. मात्र अचानक काही वेळ ती सलमानच्या स्टाईलप्रमाणे चालली.
ट्रेलर पाठोपाठ आता 'टायगर जिंदा है' चित्रपटातील 'स्वॅग से स्वागत' या गाण्याकडे चाह्त्यांचं लक्ष लागले आहे. 'इंडियन सुपर लीग' मध्ये सलमान आणि कॅटरिनाने काही गाण्यांवर ठेकादेखील धरला होता.