Katrina Kaif Birthday Special : भारतात टॉमेटोचे दर हे कुठच्या कुठे जात आहेत. नागपुरात टॉमेटोचे दर हे 200 रुपयाच्या पार गेले आहेत. टॉमेटोचे दर पाहून अनेकांनी टॉमेटो विकत घ्यायचं बंद केलं आहे. तर अनेकांनी टॉमेटो ऐवजी चिंच किंवा कोकम वापरण्यास सुरुवात केली आहे. इतकंच काय तर मॅक्डॉन्डनं त्यांच्या मेनूमधून टॉमेटो काढून टाकला आहे. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. पण टॉमेटोचे वाढते दर पाहून नेटकऱ्यांना बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची आठवण आली आहे. कतरिनाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज कतरिनाचा वाढदिवस आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी कतरिना आणि टॉमेटोचे अनेक मीम शेअर कतरत तिच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील एका सीनची आठवण काढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनासोबत या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत होता. तर या चित्रपटात टॉमेटो फेस्टिव्हल दाखवण्यात आला आहे. हा सीन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील 'एक जुनून' या गाण्यात दाखवण्यात आला आहे. त्यावेळी प्रेक्षकांना हा टॉमेटो फेस्टिव्हल खूप आवडला आहे. खरंतर नुकतेच या चित्रपटाला 15 जुलै रोजी 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता नेटकऱ्यांना त्या सीनची आठवण आली आहे. कारण या सीनसाठी निर्मात्यांनी पोर्तुगालमध्ये तब्बल 16 टन टॉमेटो विकत घेतले होते. 



निर्माता रितेश सिधवानी म्हणाले की त्या फेस्टिव्हलला जसं आहे तसं दाखवण्यासाठी पोर्तुगालवरून 16 टन टॉमेटो मागवण्यात आले होते. कारण स्पेनमध्ये टॉमेटो पिकले नव्हते. तर असं म्हटलं जातं की त्यावेळी फक्त टॉमेटोची किंमत आणि त्यांना पोर्तुगालवरून स्पेनला आणण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर जोया अख्तरनं हे देखील सांगितलं होतं की त्यांनी या टोमाटिना फेस्टिव्हलचं शूटिंग त्याच ठिकाणी जिथे ते करण्यात येतं. त्यासाठी त्यांना बुन्योल शहराला बूक करावं लागलं होतं. 


 हेही वाचा : Abhishek Bachchan राजकारणात करणार प्रवेश? 10 वर्षांपूर्वीच दिलं होतं उत्तर


जोया पुढे तिथल्या रहिवाश्याविषयी बोलताना म्हणाली की ते लोक खूप चांगले आणि प्रेमळ आहेत. त्यांनी त्या वर्षी दोन वेळा टोमाटिना साजरा केला. एक स्पेनसाठी आणि एक भारतासाठी. हा सण आपल्या होळी प्रमाणे आहे. त्यादिवशी संपूर्ण जग हे लाल होतं. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप मज्जा आली. निर्मात्यांसाठी हे खूव वेगळं होतं असं जोयानं पुढे सांगितलं.