मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान सध्या टायगर जिंदा है या सिनेमाच्या कामामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रत्येक बाजूला प्रशंसा केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सलमान-कॅटचे काही फोटो व्हायरल होत आहेत. जे या चित्रपटाशी जोडलेले आहेत. दोघांमधली केमिस्ट्री चर्चेत आहे. आता सध्या सलमान जे काय म्हणतो त्यावर कॅटरीना त्याला हो बोलते. पण आता सलमान कॅटरीनावर नाराज होतो की काय अशी चर्चा आहे.


सलमान खानचं द बँग टूर दिल्लीमध्ये होणार आहे. या मोठ्या कार्यक्रमासाठी तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या कार्यक्रमात भाईजान परफॉर्म करणार आहे. असेही सांगण्यात आले होते की, कॅट देखील सलमान सोबत या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. पण कॅटरीना यासाठी तयार नाही आहे.


कॅटरीनाकडे सध्या वेळ नाही आहे, सलमानचा डबंग टूर तिने रिजेक्ट केला आहे. आता या कार्यक्रमात ती सलमान सोबत परफॉर्म करणार की नाही याबाबत चर्चा रंगल्या आहे.