मुंबई : अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटरिना सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. अमेरिका, कॅनडाच्या 'द बॅंग' टूरवर असलेल्या कॅटरिना नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. 


कॅटरिना कैफचा हॉट अंदाज  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅटरिना कैफने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट अंदाजातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट अंदाजात असून त्याखाली तिने खास कॅप्शन लिहले आहे. 
'मलंग' असे लिहल्याने तिच्या चाहत्यांना पुन्हा 'धूम 3' ची आठवण झाली. 'धूम 3' या चित्रपटामध्ये कॅटरिना 'मलंग' या गाण्यावर थिरकली होती. या गाण्यातील हॉट अंदाज या फोटोमुळे पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.  


 



अमेरिकेत कॅटरिना कैफ  


अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या अमेरिकेमध्ये सलमान खानसोबत 'द बॅंग' टूरवर आहे. या टूरमध्ये जॅकलीन फर्नांडीस, प्रभूदेवा, पंजाबी गायक गुरू रंधावा, मनीष पॉल,सोनाक्षी सिन्हा, डेजी शहा यांचा सहभाग आहे. 22 जूनपासून अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध राज्यात या टूरचे लाईव्ह परफॉर्मन्स होतात.