नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतचं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. 


(फोटो पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सिंपल आणि सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने केवळ सनसेट असचं लिहीलं आहे.


युजर्सचा गोंधळ


कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्री आणि सनसेट दोन्हीही खूपच सुंदर दिसत आहेत. त्यामुळे युजर्सही गोंधळून जात आहेत की पहिल्यांदा नेमकं कुणाला पहावं.


हा फोटो पाहता असं दिसत आहे की कतरिनाने एक्सरसाइज नंतर हा फोटो काढला आहे. 



अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आमिर खानच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका आहेत.


यासोबतच कतरिना सध्या शाहरुख खानच्या 'झिरो' या सिनेमासाठीही शूटिंग करत आहे. हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.