भारतात न मिळालेली ती गोष्ट, अखेर कतरिनाला मिळाली तुर्कीत?
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या ब्लॉकबस्टर टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीमध्ये आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या ब्लॉकबस्टर टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीमध्ये आहे. अॅक्शन मालिकेत सलमान खानच्या बरोबरीने मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अनेकदा व्यस्त दिसते.
इन्स्टाग्राम स्टोरीव्दारे ती शुटींग संदर्भातील अनेक अपडेट देत असते. कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अलीकडील व्हिडिओमध्ये ती तुर्कीतील एका मार्टमध्ये खरेदी करताना दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले, 'सुपरमार्केटमध्ये ही खरेदी केल्याने मला खूप उत्साह वाटतो.' या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ दुकानामध्ये फिरत आहे.
यापूर्वी कतरिनाने एक फोटोही पोस्ट केला होता, जिथे ती निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होती. यावेळी कतरिना हुडी आणि जीन्समध्ये दिसली होती. रशियातील शुटींग पूर्ण करून टायगर 3 ची टीम नुकतीच तुर्कीला गेली आहे. असे म्हटले जात आहे की सलमान आणि कतरिना तुर्कीमध्ये एका गाण्याच्या सिक्वन्सचे चित्रीकरण करत आहेत.