मुंबई : गेले बरेच दिवस कतरिना कैफच्या (Katrina Kaif) प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. जेव्हा आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) पालक होण्याची घोषणा जाहीर केली, तेव्हापासून कतरिना आणि विकीदेखील लवकरच पालक होणार अशी चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा एका व्हिडिओवरुन अशा चर्चांना उधाण आलं आहे. आता अलीकडेच जेव्हा कतरिना पती विकीसोबत डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर दिसली, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. पण ही बातमी खरी आहे की नाही हे जाणून घेऊया...


आणखी वाचा : 'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना आणि विकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कतरिना आणि विकीचे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. दोघेही क्लिनिकच्या बाहेर दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याचं स्पष्ट आहे असे बोलत होते. पण हे सत्य नाही. 


आणखी वाचा : King Cobra च्या तोंडातून निघाला विषारी साप, ती घटना पाहून नागरिकही झाले थक्का, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क



मग कतरिना क्लिनिकमध्ये का गेली? हा प्रश्न तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल तर कतरिना ही गेल्या अनेक दिवसांपासून दातदुखीनं त्रस्त आहे. तिला अक्कल दाढ येत आहे. त्यामुळे तिला वेदना होत होत्या. हे स्वत: विकीनं कॉफी विथ करणमध्ये सांगितलं. 


आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा



कतरिना आणि विकीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये शाही विवाह केला. या लग्नाला फक्त जवळचे लोक उपस्थित होते. यानंतर हे जोडपं हनिमूनसाठी मालदीवला गेलं. तिथून परतल्यानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त असले तरी प्रत्येक उत्सवाला ते एकत्र असतात. 


आणखी वाचा : 'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude


वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना आणि विकी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. कतरिना पुढे 'टायगर 3', 'फोन भूत', 'जी ले जरा' आणि 'मेरी क्रिसमस' मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर विकी 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' आणि 'लुका छुपी 2' मध्ये दिसणार आहे.