मुंबई : कतरिना कैफ भलेही मीडियापासून अंतर ठेवते.  पण तिची सोशल मीडियाशी घट्ट मैत्री  आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती थेट चाहत्यांशीही जोडलेली असते. तिला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा-तेव्हा ती  खास फोटो शेअर करते आणि तिच्या चाहत्यांना सरप्राईज देते. आता पुन्हा एकदा कतरिनाने स्वतःचा एक खास फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या आठवणीत हरवली कतरिना कैफ 
शेअर केलेल्या फोटोवरुन कतरिना कैफ तिचे बालपणीचे दिवस खूप मिस करत आहे. आता ते क्षण पुन्हा जगणं अवघड आहे. पण कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्या आठवणी शेअर करून ती मागील दिवसांच्या आठवणी ताज्या करत आहे. कतरिना कैफने इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला एका दृष्टीक्षेपात ओळखणं कठीण आहे. 



मात्र, काही वेळ पाहिल्यानंतर ती कतरिना असल्याचं कळतं. या फोटोमध्ये कतरिनाने आपले केस मागच्या बाजून क्लच केले आहेत आणि ती ओवरसाइज जॅकेटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत कतरिना कैफने एक मजेदार कॅप्शनही लिहिलं आहे.  'तेव्हाही ओव्हरसाईज घालायचे.' कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.