कतरिनाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरु, कतरिना जातेय एक महिन्याच्या ब्रेकवर?
कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सतत चर्चेत आहेत.
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सतत चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, विकी कौशल आणि कतरिना कैफ या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात. दरम्यान, या दोन स्टार्सशी संबंधित अनेक बातम्या एकामागून एक समोर येत आहेत. आज आम्ही तुम्हाला असंच काहीसं सांगणार आहोत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कतरिना कैफ पूर्ण एक महिन्याच्या ब्रेकवर जाणार आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री हा ब्रेक डिसेंबर महिन्यात घेणार आहे. कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्याही अफवा आहेत. बातम्यांनुसार, सध्या कतरिना तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सूर्यवंशी'च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, कतरिना थेट 2022 मध्ये टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. याचा अर्थ, कतरिनाकडे संपूर्ण डिसेंबर महिना फ्रि आहे.
कतरिना संपूर्ण डिसेंबर महिना फ्री असणार आहे आणि यादरम्यान अभिनेत्री तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असेल असं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकी कौशलने स्वतःसाठी नवीन घर देखील पाहिलं आहे.. असं सांगितलं जात आहे की, हे दोन्ही स्टार मुंबईच्या पॉश जुहू भागात असलेल्या या घरात लग्नानंतर शिफ्ट होणार आहेत जिथे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे ते शेजारी असतील.