मुंबई : इथे विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचा पहिला फोटो केव्हा समोर येतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच अखेर या जोडीनं एका नव्या नात्यावर मोहोर लावत लग्नातीच पहिली झलक सर्वांच्या समोर आणली. असं म्हणतात लग्नानंतर प्रत्येक महिलेचं आयुष्य बदलतं. कतरिनासोबतही काहीसं तसंच झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी कौशलच्या Cousin कडून लग्नाबाबतची काही माहिती समोर आली आहे. उपासना वोहरा या त्याच्या बहिणीनं लग्नसमारंभावेळी आणि त्यानंतर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.


सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी तिला कतरिनाला पंजाबी भाषा येते का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. त्यावेळी तिचं उत्तर सर्वांनाच हैराण करणारं होतं.


लग्नावेळी आणि लग्नानंतरही कतरिना इंग्रजी किंवा हिंदीत नव्हे, तर चक्क पंजाबीमध्ये बोलत होती याचा उलगडा उपासनानं केला. कतरिनाची प्रत्यक्षात भेट घेण्यापासून ते अगदी तिच्या कुटुंबीयांशी समरस होण्यापर्यंत सारंकाही सुरेख अनुभव देणारं होतं, असं विकीच्या बहिणीनं सांगितलं.


कतरिनाला पंजाबी भाषाही येत असेल यावर अनेकांचा विश्वासच बसला नाही. पण, तिच्यातल्या या बदलाचं सर्वांना फारच कौतुक वाटलं हेसुद्धा खरं. 


विकीच्या या बहिणीनं आपल्या वहिनीचं कौतुक करत इथंच हार मानली नाही, तर तिनं कॅटसाठी एक सुंदर पोस्टही लिहिली.



‘वहिनी... खुप खुप आभार. ज्या पद्धतीने तू घरातील नात्याचे बंध आणखी घट्ट करत आहेस ते खरंच प्रेरणादायी आहे...’, असं तिनं लिहित कतरिनाकडून मिळालेल्या गिफ्टचा फोटो शेअर केला.