मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चांनी अनेकांच्याच नजरा वळवल्या आहेत. विकी आणि कतरिनामध्ये जवळीक वाढू लागली तेव्हापासूनच या जोडीबाबत चाहत्यांनी कुतूहल व्यक्त केलं होतं. ज्यानंतर आता थेट ही जोडी लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. (Katrina Kaif Vicky Kaushal )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्य़ा वेगानं विकी- कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा समोर येत आहेत. ते पाहता ही जोडी फार आधीपासूनच त्यांच्या या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे बेत आखत होती हे स्पष्ट होत आहे. 


आता म्हणे विकी आणि कतरिनानं जुहूतील एका अत्यंत आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. त्य़ांचा हा फ्लॅट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या सेलिब्रिटी जोडीच्या शेजारीच असल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार विकी आणि कतरिनानं घराची डील फायनल केली असून, लग्नानंतर ही जोडी इथंच राहणार आहे. 


दरम्यान, लग्नाच्या चर्चांबाबत विचारलं असता कतरिनानं या साऱ्या चर्चा नाकारल्या होत्या. पण, एकिकडे ती हे सारं नाकारत असतानाच दुसरीकडे मात्र तिची आई आणि बहीण भारतीय अंदाजातील पेहरावाची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळं डिसेंबर महिना खऱ्या अर्थानं गाजणार हेच आता हळुहळू स्पष्ट होत आहे.