जयपूर : बॉलिवूड चाहत्यांना मागच्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटांची नव्हे तर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचीच उत्सुकता लागली होती. विकी आणि कतरिनानं त्यांच्या लग्नाची ही बाब अतिशय गोपनीय ठेवत सर्वांची उत्सुकता ताणून धरली होती. अखेर तो क्षण आला, जेव्हा कतरिना कैफ ही मिसेस कतरिना कौशल या रुपात सर्वांसमोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी आणि कतरिनाच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. 


वधुरुपात कतरिनाला पाहताना सर्वांच्या डोळ्यांत एक वेगळी चमक दिसली. एखादी लहान मुलगी तिच्या जीवनातील खास प्रसंगांवर ज्याप्रमाणे कुतूहलाने व्यक्त होते, अगदी तसंच हास्य कतरिनाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. 


विकीचीही अशीच काहीशी परिस्थिती. मेरे खयालों की मलिका... म्हणत कतरिनापुढे प्रेमानं झुकणारा विकी सर्वांनाच #HusbandGoals देत होता. 


कतरिनानं लग्नासाठी लाल रंगाचा लेहंगा निवडला होता. तर, विकीनंही तिला शोभेल अशी शेरवानी निवडली होती. या दोघांनीही सब्यसाची या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरची निवड केली होती.


टिला वर्क असणाऱ्या एका क्लासिक लाल रंगाचा मटका सिल्क लेहंगा तिनं निवडला होता. यावर वेल्वेटवर जरदोसी वर्क करण्यात आलं होतं. 



अनकट हिऱ्यांची 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची सांगड तिनं या लेहंग्याशी घातली होती. हातात साजेसे कलिरे आणि डोक्यावर दुहेरी माथापट्टी असा तिचा एकंदर लूक होता. 


तर, विकीनं आयव्हरी शेडमधील शेरवानी निवडली होती. ज्यावर वाघाचं चिन्हं असणारी सोनेरी बटणं होती. जरीची बॉर्डर असणारा टसर जॉर्जेटचा एक शॉलवजा कपडा त्याच्या खांद्यावर होता.


सब्यसाची हेरिटेज कलेक्शनमधून त्यानं गळ्यातील हार निवडला होता. सौंदर्याला चार चाँद लावेल असाच या दोघांचा लूक होता असं म्हणणं